Warranty issue

Name of Complainant GANESH BALASAHEB CHANDANSHIV
Date of ComplaintJune 5, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint Electronic Appliances
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by GANESH BALASAHEB CHANDANSHIV:

नमस्कार, मी गणेश बाळासाहेब चंदनशिव, रा-किवत,ता-भोर, जि-पुणे. माझी तक्रार अशी आहे की, मी सुमारे दीड वर्षापूर्वी ह्युंदाई कंपनीचा 50 ईंंच एल.ई.डी टीव्ही भोरमधील आशीर्वाद ईलेक्ट्रॉनिक या दुकानातील डीलर कडून खरेदी केला होता. साधारण 2 महिन्यापुर्वी तो अचानक बंद पडला. परंतु, त्या टीव्ही ची 3 वर्ष वॉरंटी असल्याने मी सदर बाबत डीलरकडे जाउन कंम्प्लेंट केली व डीलरने सांगीतले की मी कंम्प्लेंट कंपनी कडे रजिस्टर करतो व शक्य असल्यास टीव्ही लवकरात लवकर रिप्लेस करतो किंवा चालू (रिपेअर) करून द्यायला सांगतो. त्यानंतरही वारंवार डीलरला फोन केला तर फोन न उचलणे, बाहेर गेले आहेत वगैरे उत्तर यायचे. मग काही दिवसांनी कंपनीच्या प्रतिनिधी चा फोन आला मग बरीच अर्ग्युमेंट झाल्यावर काही दिवसांनी भोरमधील सर्व्हिस एजंट कडून एकजण येऊन टीव्ही खोलून चेक करून त्यातील पार्ट ऑर्डर करावा लागेल असे सांगून गेला. यामध्ये साधारणपणे 1 ते सव्वा महीना असाच गेला.
त्यानंतरही लवकर रिप्लाय न आल्यामुळे मी वारंवार सर्व्हिस एजंट ला फोन करून शेवटी अगोदर सर्व्हिस चार्ज ऑनलाईन लगेच पे केला. त्यानंतर बरेच दिवस गेल्यावर सारखं फोन करून तो पार्ट मिळवून त्यांनी टीव्ही चालू करून दिला. यामध्ये साधारणपणे दीड ते पावणे दोन महिने गेले. टीव्ही दोन दिवस ठीक चालू झाला परंतु, दोन दिवसानंतर परत सारखा रिस्टार्ट होऊ लागला. म्हणून परत सर्वांना फोन करुन तीच सर्व प्रोसीजर, डीलर तर आता फोन देखील उचलत नाही. या मध्ये मला फार त्रास आणी खुप मनस्ताप झाला आहे. साधारण 2 महीने होत आलेत टीव्ही बंद आहे, कोणी फोन उचलत नाही, याचा मला फार त्रास होतोय. तरी मला न्याय मिळणेस आणी नुकसान भरपाई होणेस नम्र विनंती आहे.

Image Uploaded by GANESH BALASAHEB CHANDANSHIV:

Warranty issue

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *