Slice Card चा रिकवरी कर्मचारी कडून होत असलेल्या विनाकारण harassment, मानसिक त्रास व दमदाटी बद्दल तक्रार देण्याबाबत.

Name of Complainant Neelesh Hangaragi
Date of ComplaintMarch 10, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint Banking
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Neelesh Hangaragi:

माननीय महोदय,
माझं नाव निलेश असून मला काही दिवसापासून Slice Card या कंपनीमधून त्यांचे रिकवरी डिपार्टमेंटचे काही अधिकारी विनाकारण एक दुसऱ्या व्यक्तीचा (विशाल केळकर) नाव घेऊन त्याचे पैसे भरण्यासाठी कॉल करून मानसिक त्रास देत व अशुद्ध भाषेत एक गुंडं सारखं मला दमदाटी करत आहेत व वेगवेगळ्या धमकी देत आहे. तरी त्याबद्दलची तक्रार साठी मी आपल्याला हे पत्र पाठवले आहे.

दिनांक 05/03/2023 रोजी सुदर्शन वानखडे 9326577067 या नावाच्या व्यक्ती Slice Card कंपनीचा रिकवरी एजंट म्हणून कॉल केला होता व विशाल केळकर या व्यक्तीचे पैसे आपण वापरले आहे तरी ते लवकरात लवकर भरा असा सांगत होता त्यावर मिनी त्याला सहजपणे असे सांगितले की, या व्यक्तीशी सध्या माझा कुठलाही प्रकारचा संबंध नाहीये हे उत्तर त्याला दिले तरी सुद्धा हा व्यक्ती कमीत कमी सात ते आठ वेळा कॉल करून मला त्यांनी त्रास दिला.

आज दिनांक 08/03/2023 रोजी मला परत सुदर्शन वानखडे 8828801837 यांनी कॉल करून विशाल केळकर चे पैसे आपण वापरले है असे त्यांचे बोलणं असून ते पैसे तुम्हाला भरावे लागतील याबद्दल आमचे बोलणे झाले यावर मी त्यांना सरळ सांगितले की माझा विशाल केलकर या व्यक्तीपासून कुठल्याही प्रकारचा संबंध नसून तुम्ही मला कुठल्याही प्रकारचा कॉल करून त्रास देऊ नका.
तुमच्या कंपनीचे पैसे जर विशाल केळकर यांनी वापरले आहेत तर कृपया करून तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा त्याच्या व्यतिरिक तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडनं ते पैसे बळजबरीने घेऊ शकत नाही. यावर त्यांनी त्यांच्या सीनियर मॅडमसी बोलणं करून दिले पहिला त्या मॅडमनी स्वतःचा कुठल्याही प्रकारचा नाव व रिकवरी एजन्सी नाव नाही सांगितलं व अशुद्ध भाषेत व एक गुंडं सारखं मला दमदाटी करू लागली. व त्यांचं म्हणणं असं आहे ते माझ्या अख्ख्या खानदानाला बघून घेतील अशी ही धमकी देत अजून बरेच काही गोष्टी केले.

तरी मला सुदर्शन वानखडे व त्यांचे सीनियर मॅडम व अजून कर्मचारी त्यांच्या या दूरध्वनी क्रमांकावरून 9326577067 / 8828801837 / 9076021432 सातत्याने फोन करून मला मानसिक त्रास देत आहे व भरपूर दमदाटही करत आहे जे सरासर चुकीचे आहे व याची नोंद तुम्ही घ्या.

Slice Card व विशाल केळकर यांच्यासोबत झालेला व्यवहाराबद्दल माझा कुठलाही प्रकार संबंध नाही.

तरी मी आपणास विनंती करतो की, असल्या रिकवरी कंपनी वरती लवकरात लवकर अंकुश करणे गरजेचे आहे जेणेकरून कुठल्या सामान्य व्यक्तीचा मान, सन्मान, पैसे व असल्या दुसरा कुठल्याही प्रकारचा नुकसान होऊ नये.

आणि त्यांच्याकडून मला व माझ्या परिवाराला कुठलाही प्रकारचा हानी होणार नाही अशी खात्री द्या अशी नम्र विनंती.

आपला विश्वासू
निलेश.

Image Uploaded by Neelesh Hangaragi:

Slice Card चा रिकवरी कर्मचारी कडून होत असलेल्या विनाकारण harassment, मानसिक त्रास व दमदाटी बद्दल तक्रार देण्याबाबत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *