Magicbricks service pvt ltd

Name of Complainant Harshada rajendra barse
Date of ComplaintSeptember 27, 2023
Name(s) of companies complained against ,
Category of complaint Corruption
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Harshada rajendra barse:

विषय – मॅजिक ब्रिकस मार्फत घेतलेल्या RB प्रीमियम प्लस लिस्टिंग च्या सेवेबाबत तक्रार अर्ज.

मा. महोदय,

वरील विषयास अनुसरून मी हर्षदा राजेंद्र बारसे, डायरेक्टर ऑफ शोभाराज रिअलटी PVT LTD, दि. 31 डिसेंबर 2022 रोजी मी आपले कर्मचारी पंकज यांना फोन केले की, मला मॅजिक ब्रिकस च्या सेवेचा लाभ घ्यायाच आहे, त्यावर पंकज यांनी मी ते पाहत नाही गणेश पाहतो. त्यांना घेऊन मी आपल्या ऑफिस ला येतो आणि सविस्तर चर्चा करू यात. त्यानंतर ते माझ्या ऑफिस वाकड येथे आले त्याना नंतर मी गणेश यांना तुम्ही मला एक चांगला पॅकेज सांगा मला त्याची कल्पना नाही. त्यावर त्यांनी RB 275 premium plus listing pune – 180 Days चे पॅकेज सांगितले , त्यात त्यांनी मला नवीन, जुने प्रोजेक्ट, रेंटल प्रॉपर्टी, प्लॉट, फ्लॅट, याचा समावेश करू शकतात. त्यातून तुम्हाला चांगला प्रतिसाद येईल व दिवसात कमी कमी 7 ते 8 लीड येतात, महिन्यात कमी कमी 100 तरी लीड येतील, असे विश्वास त्यांनी मला दिला, त्यांनी दिलेल्या शब्द वर विश्वास ठेवून मी त्यांना RB 275 लिस्टिंग साठी होकार दिला.

दि 27 जानेवारी2023 ला पंकज यांनी मला माझे पॅकेज खरेदी केल्याची पावती माझ्या ई-मेल ला आली. रुपये ४५५०० मात्र, या रकमेचा चेक मी त्याना दिला होता. त्यानंतर माझी सेवा सुरु करण्यात आली. मी प्रोजेक्ट पोस्ट करायला सुरुवात केली , त्यानंतर फेब्रुवारी व मार्च मध्ये मला अवघ्या २ ते ५ प्रमाणे लीड आल्या. एप्रिल २३ मध्ये १६, मे २३ मध्ये २८, जुन २३ मध्ये २८ अश्या प्रकारे लीड येत होत्या, मी केलेल्या पोस्ट ह्या सेल व रेंट यासाठी होत्या परंतु मला सेलला कोणत्या प्रकारे लीड येत नसल्याने फक्त रेंटसाठी येत होत्या, सेलच्या पोस्ट वर पण रेंटच्या लीड येत असल्याने मी हे बाब पंकज यांच्या कानी टाकली, कारण माझे सेल्स मॅनेजर गणेश फोन msg कशाला हि रिप्लाय दिला नाही ना कॉल बॅक केले गायब होते, मार्च मध्ये मी पुन्हा पंकज यांना १५५५२ रुपये चा चेक दिला.

याबाबत मी पंकज यांच्या सोबत वारंवार चर्चा करत होते, शेवटी कंटाळून मी ३० मे २०२३ रोजी यांना व्हॉट अँप द्रारे स्क्रीन्स शॉट दिले व यावर काही तरी उपाय करा. त्यावर त्यांनीही मी वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत बोलून कळवतो. तसे त्यांनी मला कळवले हि आणि उत्तर दिले. परंतु माझे जे तक्रार आहे त्यावर अद्यापही कोणताही तोडगा निघाला नाही. गेल्या २ महिन्यापासून आम्ही तुमच्या ऑफिस ला येतो, कॉल करतो हेच सुरु आहे फक्त, पण तोडगा निघाला नाही. मॅजिक ब्रिकस ने केलेल्या प्रॉमिसेस पैकी एकही प्रॉमिस पूर्ण केले नाही व तशी सेवा देखील देण्यात आली नाही. माझे ६१००० रुपये देऊन मला त्याचे मागे असं पाळावा लागत आहे. यात माझे आर्थिक नुकसान तर झाले आहे परंतु याचा माझ्या व्यवसाय वर पण परिणाम झाला आहे ६ महिण्यात १ सुद्धा लीड क्लोज झाली नाही. या सर्वंचा मला एकंदरीत मानसिक त्रास होत आहे.त्यावर कंटाळून मी त्यानं मॅजिक विरोधात consumer court मध्ये जाईल असे सांगितले. असे बोलूनही त्याचे कडून कोणतेही सहकार्य करतील हे दिसून येत नाही . आणि माझे बोलणे ते गांभीर्याने घेत नाही.

Image Uploaded by Harshada rajendra barse:

Magicbricks service pvt ltd

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *